Friday, October 31, 2014

Parvatapramane patak karane / पर्वताप्रमाणे पातक करणे / Haripath Abhang Satava

पर्वताप्रमाणे  पातक करणे ।
वज्रलेप होणे  अभक्तांसी  ।।१।।
नाहीं ज्यांसी भक्ति ते  पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ।।२।।
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्यां कैंचा दयाळ पावे  हरी  ।।३।।
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटीं पूर्ण ऐक  नांदे   ।।४।।

Thursday, October 2, 2014

Sadhubod zala to nuroniya thela / साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला / Haripath Abhang Sahava

साधुबोध झाला तो  नुरोनिया ठेला ।
ठायींच मुराला अनुभव ।।१।।
कापुराची वाती उजळली ज्योती ।
ठायींच समाप्ती झाली जैसी  ।।२।।
मोक्षरेखे आला भाग्ये विनटला ।
साधूचा अंकिला हरिभक्त  ।।३।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं ।
हरि दिसे  जनीं वनी आत्मतत्वि ।।४।।

Wednesday, October 1, 2014

Yog Yag Vidhi yene nohe sidhi / योगयागविधी येणे नोहे सिद्धि / Haripath Abhang Pachava

योगयागविधी येणे नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म  ।।१।।
भावेविण देव  न कळे निःसंदॆह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ।।२।।
तपेविण  दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेविण  हित कोण सांगे ।।३।।
ज्ञानदेव सांगे  दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरुणोपाय ।।४।। 

Bhavevin Bhakti Bhaktivin Mukti / भावेविण भक्ति भक्तिवीण मुक्ति / Haripath Abhang Chautha

भावेविण भक्ति भक्तिवीण मुक्ति |
बळेविण शक्ति बोलू  नये  ||१||
कैसेनि  दैवत प्रसन्न त्वरित |
उगा राहे निवांत शिणसी वायां ||२||
सायास करिसी प्रपंच दिननिशीं |
हरिसी न भजसी कवण्या  गुणे  ||३||
ज्ञानदेव  म्हणे हरिजप करणे  |
तुटेल धरणे प्रपंचाचे  ||४||

Tuesday, September 30, 2014

Trigun Asar Nirgun Ye Sar / त्रिगुण असार निर्गुण हे सार / Haripath Abhang tisara

त्रिगुण असार निर्गुण हे सार |
सारासार विचार हरिपाठ ||१||
सगुण निर्गुण गुणांचे अगुण |
हरिविणे मन व्यर्थ जाय ||२||
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार |
जेथोनी  चराचर हरीसी भजे ||३||
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं |
अनंत जन्मोनी पुण्य होय ||४||

Chahu Vedi Jaan Sahi Shastra karan / चहूं वेदीं जाण साहीं शास्त्री कारण / Haripath Abhang dusara

चहूं वेदीं जाण साहीं शास्त्री कारण |
अठराहीं पुराने हरीसी गाती ||१||
मंथुनी नवनीता  तैसें घे अनंता |
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ||२||
एक  हरि आत्मा जीवशिवसमा |
वायां दुर्गमी न घालीं मन ||३||
 ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ |
भरला घनदाट हरि दिसॆ ||४||

Devachiye Dwari Ubha kshanabhari / देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी / Haripath Abhang pahila

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी |
तेणे मुक्ति चारी साधियेल्या   ||१||
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा |
द्वारकेचा राणा पांडवां घरीं  ||४||