Tuesday, September 30, 2014

Trigun Asar Nirgun Ye Sar / त्रिगुण असार निर्गुण हे सार / Haripath Abhang tisara

त्रिगुण असार निर्गुण हे सार |
सारासार विचार हरिपाठ ||१||
सगुण निर्गुण गुणांचे अगुण |
हरिविणे मन व्यर्थ जाय ||२||
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार |
जेथोनी  चराचर हरीसी भजे ||३||
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं |
अनंत जन्मोनी पुण्य होय ||४||

Chahu Vedi Jaan Sahi Shastra karan / चहूं वेदीं जाण साहीं शास्त्री कारण / Haripath Abhang dusara

चहूं वेदीं जाण साहीं शास्त्री कारण |
अठराहीं पुराने हरीसी गाती ||१||
मंथुनी नवनीता  तैसें घे अनंता |
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ||२||
एक  हरि आत्मा जीवशिवसमा |
वायां दुर्गमी न घालीं मन ||३||
 ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ |
भरला घनदाट हरि दिसॆ ||४||

Devachiye Dwari Ubha kshanabhari / देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी / Haripath Abhang pahila

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी |
तेणे मुक्ति चारी साधियेल्या   ||१||
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा |
द्वारकेचा राणा पांडवां घरीं  ||४||

Mauli Mauli Lyrics / माऊली माऊली

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली, तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला, तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा, परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा

दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय