Thursday, July 10, 2014

anu renu ya thokada / anurenuya thokada / अणुरेणियां थोकडा

अणुरेणियां थोकडा
तुका आकाशाएवढा

गिळुन सांडिलें कलेवर
भव भ्रमाचा आकार

सांडिली त्रिपुटी
दीप उजळला घटीं

तुका म्हणे आतां
उरलो उपकारापुरता 

aga karunakara lyrics / अगा करुणाकरा करितसे धांवा

अगा करुणाकरा करितसे धांवा
या मज सोडवा लवकरी

ऐकोनियां माझी करुणेची वचने
व्हावें नारायणें उतावीळ

मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव
ठेवूनि पायीं भाव वाट पाहें

उशीर तो आतां न पाहिजे केला
अहो जी विठ्ठला मायबापा

उरलें तें एक हेंचि मज आतां
अवघें विचारितां शून्य झालें

तुका म्हणे आतां करीं कृपा दान
पाउलें समान दावीं डोळा

omkar pradhan rup ganeshache / omkar pradhan roop ganeshache / ओंकार प्रधान रूप गणेशाचे

ओंकार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान

आकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला

ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न
तो हा गजानन मायबाप

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचिया 

Monday, July 7, 2014

Jethe jato tethe tu maza sangati / जेथे जातो तेथे तू माझा सांगाती / tuch maza sangati lyrics / तू माझा सांगाती

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हाती धरुनिया

चालो वाटे आम्ही तुझाची आधार
चालविसी भार सवे माझा

बोलो जाता बरळ करीसी ते नीट
नेली लाज, धीट केलो देवा

तुका म्हणे आता खेळतो कौतूके
जाले तुझे सुख अंतर्बाही