Wednesday, June 25, 2014

Mayechya halavya / man udhan varyache / मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते / मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिर्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते?
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते

Sunday, June 8, 2014

bikat vaat vahivat nasavi lyrics / बिकट वाट वहिवाट नसावी

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको

नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको


मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको

हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी हो‍उनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको

विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको

दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको

आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको

सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको
गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको

सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको

--अनंतफंदी 

Wednesday, June 4, 2014

deva tuzya gabharyala lyrics / देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही / duniyadari lyrics

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले

स्वप्न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी

का रे तडफड ही ह्या काळजा मधी
घुसमट तुझी रे होते का कधी
माणसाचा तू जल्म घे, डाव जो मांडला मोडू दे

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

चित्रपट - दुनियादारी 

kashi nashibane thatta aaj mandali lyrics / Pinara / कशी नशीबाने थट्टा आज मांडली

दहा दिशांनी , दहा मुखांनी. आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते एका हो

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

गंगेवानी निर्मळ होता, असा एक गाव
सुखी समाधानी होता, रंक आणि राव
त्याची गुण गौरवान  कीर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्टी लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेना, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

पिसळलेल्या नागीनिनीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

जाब विचारया गेला, तिने केला डाव
भोवरयात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

खुल्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्रा मांजराची दशा आणली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

जन्मभरी फसगत झाली तिचा हा तमाशा
जुळुनीया गेली आता जगायची आशा
आज हुंदक्यान भिरवी मी गायली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मा सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

haravali pakhare marathi lyrics /का कळेना अशी हरवली पाखरे / ka kalena ashi haravali pakhare

कुठे कधी हरवले कसे कोण जाणे
चोचीतले त्यांच्या गाणे
नभाच्या मनाला पडे घोर आता
उखाणे कसे सोडवावे
कसे वागणे हे कळ्यांचे फुलांशी कळेना
कधी वाढले हे दुरावे  कळेना, झुरे बाग आता
सुनी सुनी सारी, का कळेना अशी हरवली पाखरे

ती अवखळ वेळी किलबिल सारी
उगीच मनाला हुरहूर लावी
सांजेला होई जीव हळवा रे
जे झाले गेले विसरुनी सारे
हा वेडा वारा सांगे अरे अंगणी पुन्हा
का कळेना अशी हरवली पाखरे

गीतकार : गुरु ठाकूर
चित्रपट : बालक पालक

Kuṭhē kadhī haravalē kasē kōṇa jāṇē
Cōcītalē tyān̄cyā gāṇē
Nabhācyā manālā paḍē ghōra ātā
Ukhāṇē kasē sōḍavāvē
Kasē vāgaṇē hē kaḷyān̄cē phulānśī kaḷēnā
Kadhī vāḍhalē hē durāvē kaḷēnā, jhurē bāga ātā
Sunī sunī sārī, kā kaḷēnā aśī haravalī pākharē

Tī avakhaḷa vēḷī kilabila sārī
Ugīca manālā hurahūra lāvī
Sān̄jēlā hō'ī jīva haḷavā rē
Jē jhālē gēlē visarunī sārē
Hā vēḍā vārā sāṅgē arē aṅgaṇī punhā
Kā kaḷēnā aśī haravalī pākharē

Gītakāra: Guru ṭhākūra
Citrapaṭa: Bālaka pālaka

Tuesday, June 3, 2014

deva tula shodhu kutha lyrics / देवा, तुला शोधू कुठं

कुठल्या देशी, कुठल्या वेशी, कुठल्या रूपात
देवा, तुला शोधू कुठं

तेहतीस कोटी रूपे तुझी, तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात, देवा , तुला शोधू कुठं

कोठे असशी तू आकाशी, कुठल्या गावी कोठे वसशी
कुण्या देवळात , देवा , तुला शोधू कुठं

भले-बुरे जे दिसते भवती, भले-बुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात, देवा , तुला शोधू कुठं

स्वच्छंदी तू स्वत:चा सखा, येथे रमसी सांग उगा का
या बाजारात, देवा , तुला शोधू कुठं