देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी |
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ||१||
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा |
द्वारकेचा राणा पांडवां घरीं ||४||
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ||१||
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा |
पुण्याची गणना कोण करी ||२||
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी |
वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ||३||
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा |
द्वारकेचा राणा पांडवां घरीं ||४||
No comments:
Post a Comment