Tuesday, May 13, 2014

runu zunu re bhramara lyrics / रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥

चरणकमळदळू रे भ्रमरा ।
भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥

सुमनसुगंधु रे भ्रमरा ।
परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥

सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा ।
बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥


Ruṇujhuṇu ruṇujhuṇu rē bhramarā.
Sāṇḍīṁ tūṁ avaguṇu rē bhramarā.

Caraṇakamaḷadaḷū rē bhramarā.
Bhōgīṁ tūṁ niścaḷu rē bhramarā.

Sumanasugandhu rē bhramarā.
Parimaḷu vidgadu rē bhramarā.

Saubhāgyasundarū rē bhramarā.
Bāpa rakhumādēvivarū rē bhramarā.

24 comments:

  1. Replies
    1. why don't you learn the language to enlighten yourself and explore your own divinity? Only when you learn the language you will enlighten yourself and also will understand the meaning.

      Delete
    2. You don't have to learn the language to understand the meaning. Be sensible. No one is forcing you to post the meaning Sunita. 😑

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. What a divine music. I can listen to this bhajan the whole day. So much intensity and emotions packed with devotion.

    ReplyDelete
  4. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
    सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥

    प्रस्तुत अभंग हा उपदेशपर प्रकरणातील असून या अभंगामध्ये माउली श्री ज्ञानोबाराय जीवास उपदेश करतात . या अभंगात श्री माउली जीवास भ्रमराची उपमा देतात . ज्याची उपमा द्यावयाची व ज्याला उपमा द्यावयाची त्या दोघात कांही साम्य असणे आवश्यक असते .श्री माउलींच्या नवनवोन्मेषशालिनी दिव्य प्रतिभेस भुंगा व जीव यांचे साम्य दिसून येते . भुंगा हा षट्पद कीटक आहे. त्यास सहा पाय असतात . तद्वत जीवास ही सहा पाय असतात ते म्हणजे श्रोत्र , चक्षु ,त्वचा ,रसना ,घ्राण व या पाच ईंद्रियांचे अध्यक्ष असलेले पण स्वतः मात्र ईंद्रिय नसलेले मन . ज्या प्रमाणे भुंगा त्याच्या या सहा पायाच्या साहाय्याने जगामध्ये विचरतो तद्वत हा जीव सुद्धा पंच ज्ञानेंद्रिय व सहावे मन यमके साहाय्य घेऊनच विचरतो . हे साम्य लक्षी घेऊन माउली श्री ज्ञानोबाराय जीवास भ्रमराची उपमा देतात व त्यास आर्जवाने उपदेश करातात -
    रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
    सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥
    या भ्रमरात व जीवात अजून एका साम्य आहे ते असे की भ्रमर हा सतत गुं गुं गुं गुं गुं गुं गुं .... करत असतो साहित्यीक परिभाषेत त्यास गुंजारव असे म्हटले जाते .माउली त्या गुंजारवास रुणुझुणु असे म्हणतात . ज्याप्रमाणे भुंगा हा सतत ,अथकपणे गुंजारव करत असतो त्याप्रमाणे जीवही सतत गुंजारव करत असतो . माउलींनी रुणुझुणु या पदासने विप्सा म्हणजे द्विरुक्ती केली आहे . त्याचे कारण प्रथम रुणुझुणु हे पद मी (अहमाध्यास ) व द्वितीय रुणुझुणु हे पद माझे (ममाध्यास) दर्शविणारे आहे . हा जीव जन्मापासून मृत्यू पर्यंत अथकपणे मी माझे... मी माझे..... असा सतत गुंजारव करत असतो म्हणून श्री ज्ञानराज माउली जीव रुपी भ्रमरास अत्यंत आर्जवाने सांगतात की बाबारे रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । ही रुणझुणरूप अहंता व ममता हा तुझ्यामधील दोष आहे . कोणतीही गुणदोषता ही सापेक्ष असते, कधी एके ठिकाणी गुण असणारी गोष्ट दुसरे ठिकाणी दोषही असू शकतो .कारण दोषाची व्याख्या कार्यविघातको दोषः अशी केली आहे . जो कार्यास विघातक असतो त्यास दोष म्हणावे अशी केली आहे . योग्य अहंता व ममता हे दोघे व्यवहारात कधी गुण असू शकतात . पण आध्यात्मात परमात्मप्राप्तीसाठी अहंता व ममता हे प्रतिबंधक ,विघातक असल्याने दोष आहेत म्हणून माउली त्या अहंतेस व ममतेस अवगुण असे सांबोधतात . व जीवरुपी भ्रमरास हे अहंता व ममतारुपी अवगुण परित्यागाविषयी अत्यंत लडिवाळपणाने सांगतात की सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥ हे जीवा मी माझे .... मी माझे रूपी रुणझुण ही आत्मप्राप्तीसाठी प्रतिबंधक असल्याने या रुणझुण रूपी अवगुणांचा तू परित्याग कर ....

    ReplyDelete
    Replies
    1. is it part of dyaneshwari or from which source pl

      Delete
    2. व! खूप छान सांगितले आपण!!
      कृपया, तुम्ही या पूर्ण काव्याचा अर्थ सांगू शकाल काय?

      Delete
    3. शहर पूर्ण पदांचे निरूपण हवे आहे. ९८९२१६५८११

      Delete
    4. खुप छान निरुपण केले धन्यवाद

      Delete
    5. Purn nirupan rahile Aste tar khup aanand zala aata.

      Delete
    6. मार्मिक , योग्य शब्दात वर्णन, आतापर्यंत कधीच ऐकले नव्हते फक्त शब्द कानावरून जात होती पण एवढा ताकदीचा मतितार्थ केवळ माऊली च करू जाणे, छान निरूपण सर , वेगळ्या अंगाने अभंग ऐकण्याची दृष्टी दिल्याबद्दल धन्यवाद

      Delete
    7. खूप सुंदर अर्थ लिहिलाय तुम्ही

      Delete
  5. असे सुयोग्य विवेचन फक्त आपल्याच घराण्याकडून अपेक्षित होते गुरुजी.
    || राम कृष्ण हरि||

    ReplyDelete
  6. खूप चांगल्या व समजेल अशा पध्दतीने हा अर्थ आपण सांगितलात.धन्यवाद

    ReplyDelete
  7. आपण केलेल्या या विवेचनाने या काव्याचा अर्थ समजून घेण्यास आणि मानवी मूल्यांशी त्याची सांगड घालण्यास मदत झाली . आपले शतशः आभार .👍💐

    ReplyDelete
  8. Sir khup chan. Mi khup divas yacha arth shodh hote. Khup chan vatle aaj vachun.

    ReplyDelete
  9. 🙏 sir please can u still simplify more and explain in English .

    ReplyDelete
    Replies
    1. Here are the lyrics of this song in English with interpretation (mine and others'). Note: Bhramara is bhanwara (bumblebee). Here our mana is the bhramara/bhanwaraa. The poet (Sant Gyaneshwar) is seeking the control of his mind as it wonders around. Here it goes.

      Runujhunu Runujhunu Re Bhramara
      Sandi Tu Avagunu Re Bhramara

      O Bhramara - You move around with a buzzing sound (runjhun runjhun) in all directions. But, get rid of your avagunas (bad habits).

      Chranakamaldalu Re Bhramara
      Bhogi Tu Nischalu Re Bhramara

      O Bhramara - Rather, direct yourself towards the Lotus Feet (of Vitthal).

      (But) you are certainly a bhogi (i.e. attached to worldly pleasures).

      Sumansugandhu Re Bhramara
      Parimalu Vidgadu Re Bhramara

      Let the fragrance (of of the Lotus Feet) steer you in the right direction.

      For it is that fragrance (parimal) which lead you to the state (gadu, i.e. gati) of Supreme Knowledge (Vid).

      So follow that fragrance.

      Soubhagyasundaru Re Bhramara
      Baap Rakhumadevivaru Re Bhramara

      O-Bhanwara, It will be indeed your beautiful fortune
      when you reach your Father (Krishna/Vitthal) and Mother Rakhumai-devi (Rukmani devi).

      I could have erred. So pardon me. But this is what I figured out. It is beautiful creation. And I just could not resist attempting to decode it.

      Nachiketa

      Delete
  10. Here are the lyrics of this song in English with interpretation (mine and others'). Note: Bhramara is bhanwara (bumblebee). Here our mana is the bhramara/bhanwaraa. The poet (Sant Gyaneshwar) is seeking the control of his mind as it wonders around. Here it goes.

    Runujhunu Runujhunu Re Bhramara
    Sandi Tu Avagunu Re Bhramara

    O Bhramara - You move around with a buzzing sound (runjhun runjhun) in all directions. But, get rid of your avagunas (bad habits).

    Chranakamaldalu Re Bhramara
    Bhogi Tu Nischalu Re Bhramara

    O Bhramara - Rather, direct yourself towards the Lotus Feet (of Vitthal).

    (But) you are certainly a bhogi (i.e. attached to worldly pleasures).

    Sumansugandhu Re Bhramara
    Parimalu Vidgadu Re Bhramara

    Let the fragrance (of of the Lotus Feet) steer you in the right direction.

    For it is that fragrance (parimal) which lead you to the state (gadu, i.e. gati) of Supreme Knowledge (Vid).

    So follow that fragrance.

    Soubhagyasundaru Re Bhramara
    Baap Rakhumadevivaru Re Bhramara

    O-Bhanwara, It will be indeed your beautiful fortune
    when you reach your Father (Krishna/Vitthal) and Mother Rakhumai-devi (Rukmani devi).

    I could have erred. So pardon me. But this is what I figured out. It is beautiful creation. And I just could not resist attempting to decode it.

    Nachiketa

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you for the wonderful translation and explanation

      Delete
  11. Nachiket. U are wonderful.
    Thank u so much for decoding.

    Can u help me with some more verses

    ReplyDelete