Tuesday, January 29, 2013

dashavatarachi aarati / aarati saprem jay jay viththala parabramha

दशावताराची आरती 


आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ध्रु॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती॥१॥

रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती॥२॥

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥आरती॥३॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती॥४॥

मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥आरती॥५॥

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥आरती॥६॥

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥आरती॥७॥

Shri Shankarachi aarati 2 / Shri Mahadevachi aarati 2 ( karpur gaura gauri shankara aarati karu tujala)


श्री शंकराची आरती 2


कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न हो‍उनि पावसि भक्ताला ॥धृ॥
त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा ।
उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा ।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥१॥
ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी ।
जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥२॥

Shri Shankarachi aarati / Shri Mahadevachi aarati ( lavadhavati vikrala brahmandi mala )


श्री शंकराची आरती 

लवधवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ध्रु॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥जय॥२॥
देवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥जय॥३॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥जय॥४॥

Viththalachi aarati2 / vitthalachi aarati2 / vithalachi aarati2 ( yei ho viththale maje mauli ye )


विठ्ठलाची आरती 2


येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु॥
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई हो  ॥ १ ॥
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई हो ॥ २ ॥
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो ॥ ३ ॥

Monday, January 28, 2013

Durge Durgat Bhari Tujvin Sansari / Devichi aarati


देवीची आरती 





दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।

वारी वारी जन्ममरणाते वारी ।

हारी पडलो आता संकट निवारी ।। १ ।।

जय देवी जय देवी महिषासुरमथनी ।

सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनी ।।

जय देवी जय देवी ।। धृ० ।।

त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।

साही विवाद करिता पडले प्रवाही ।

ते तू भक्तालागी पावसी लवलाही ।। २ ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां ।

क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।

अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा ।

नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।

Shri Ramchandranchi aarati ( utkat sadhuni shila setu bandhoni )


श्री  रामचंद्रांची  आरती 



उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।

लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।

कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।

देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।

लंका दहन करुनी अखया मारिला ।

मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।

आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।

म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।

आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।

आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार ।

अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।

अयोध्येसी आले दशरथकुमार ।

नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।

सोऽहंभावे तया पूजा उपचार ।

सहजांची आरती वाद्यांचा गजर ।

माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।

Shri Dattachi aaracti/ Shri Dattatrayanchi aarati ( trigunatmak traimurti datta ha jana )


श्री दत्ताची  आरती   



त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्दें नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरति ओंवाळीतां हरली भवचिंता ॥ ध्रु ॥
सबाह्य-अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ॥
पराहि परतली तेथें कैंचा हा हेत ।
जन्मरणाचा पुरलासे अंत ॥ जय॥ २ ॥
दत्त येऊनियां उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगें प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्मरमरणाचा फेरा चुकवीला ॥ जय॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान ।
हारपलें मन झालें उन्मन ।
मीतूंपणाची झाली बोळवण ।
एकाजनार्दनी श्रीदतध्यान ॥ जय देव ॥ ४ ॥

Shri Sant Dnyaneshwaranchi aarati ( aarati dnyanaraja mahakaivalyateja sevati sadhusant )


संत ज्ञानेश्वर आरती   



आरती ज्ञानराजा ॥
महाकैवल्यतेजा ॥
सेविती साधुसंत ॥
मनु वेधला माझा ॥ ध्रु॥
लोपलें ज्ञान जगीं ॥
त नेणती कोणी ॥
अवतार पांडुरंग ॥
नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥
कनकांचे ताट करीं ॥
उभ्या गोपिका नारी ॥
नारद तुंबरु हो ॥
साम गायन करी ॥ आरती ॥ २ ॥
प्रगट गुह्य बोले ॥
विश्व ब्रह्मची केलें ॥
रामा जनार्दनीं ॥
पायीं ठकचि ठेलें ॥ आरती ॥ ३ ॥

Shri Tukaram Mharajanchi aarati ( aarati tukarama swami sadguru dhama )


श्रीतुकारामांची आरती

स्वामी सदगुरुधामा ॥
सच्चिदानंद मूर्ती ।
पाय दाखवीं आम्हां ॥ ध्रु॥
राघवें सागरांत ।
पाषाण तारीले ॥
तैसे हे तुकोबाचे ।
अभंग उदकीं रक्षिले ॥ आरती ॥ १ ॥
तुकितां तुलनेसी ।
ब्रह्म तुकासी आलें ॥
म्हणोनि रामेश्वरें ।
चरणीं मस्तक ठेविलें ॥ आरती॥ २ ॥

Shri Marutichi aarati / shri Hamumanachi aarati ( satrane uddane hunkar vadani )


श्री  मारुतीची  आरती 


सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता ॥ ध्रु० ॥
दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद ॥
रामीं रामदासा शक्तीचा बोध ॥ जय देव॥ २ ॥

Sunday, January 27, 2013

Pasayadan By Sant Dnyaneshwar ( aata vishwatmake deve )

0

                                पसायदान



आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

Vithalachi(Vitthalachi / viththalachi) arathi ( Yuge aththavis )



विठ्ठलाची आरती 


 युगे अटावीस विटेवरी उभा
वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ||
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा  ||1||
जय देव जय देव जय पांडुरंगा |
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ||
जय देव जय दे || ध्रु  ||
तुळसीमाला गलान कर ठेवुनि कटीं |
कासें पीतांबर कस्तुरी लल्लाटीं  ||
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ||2||
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाला  |
सुवर्णांची कमळ वनमाला गलां ||
राही-रखुमाबाई राणीया सकळ  ||
ओंवोलिती राजा विठोभा सांवला ||3||
ओंवालूं आरत्या कुर्वंडया येती ||
चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ||
दिडया पताका वैष्णव नाचती |
पंडरीचा महिमा वर्णावा किती ||4||
आषाढ़ी कार्तिकी भक्त्जन येती |
चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती |
दर्शनहेलामात्रें तयां होय  मुकती |
केशवासी नामदेव भवें ओवालिती ||5||

Ganapatichi Aarati ( Sukhakarta dhukhaharta )

गणपतीची आरती




सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता  विघ्नाची | 
नुरवी  पुरवी  प्रेम  कृपा  जयाची |
सर्वांगी  सुंदर  उटि शेंदूराची |
कंठी शोभे  माळ मुक्ताफलांची  || १ ||
जय  देव  जय  देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना  पुरती || धु ||
रत्नखचित  फरा  तुज  गौरीकुमरा |
चंदनाची  उटि  कुमकुम  केशरा |
हीरेजडित मुकुट  शोभतो  बरा |
 रुन्ज्हुन्ति  नूपुरे  चरनी  घागरिया || २ ||
जय  देव  जय  देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना  पुरती || धु ||
 लंबोदर  पीताम्बर  फनिवरबंधना  |
 सरल  सोंड  वक्रतुंड  त्रिनयना |
 दास  रामाचा  वाट  पाहे  सादना |
 संकटी  पावावे , निर्वाणी  रक्षावे , सुखरवंदना || ३ ||
जय  देव  जय  देव जय मंगलमूरति दर्शानामाथ्रे मन:कामना  पुरती || धु ||