Sunday, March 12, 2017

denaryane det jave / देणा-याने देत जावे विंदा करंदीकर

देणा-याने देत जावे
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावेत.

कवी ---- विंदा करंदीकर

labhale amhas bhagya bolato marathi / लाभले आमहास भाग्य बोलतो मराठी सुरेश भट

लाभले आमहास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य  एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढा जगात माय मानतो मराठी

आमुच्या  मनामनात दंग ते मराठी
आमुच्या  रगरगात रंगते मराठी
आमुच्या  उरा उरात स्पंदते  मराठी
आमुच्या  नसानसात नाच ते मराठी

आमुच्या  पिलापिलात  जन्मते मराठी
आमुच्या  लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या  मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या  घराघरात वाढते मराठी

आमुच्या  कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते  मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुलया घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

कवी ---- सुरेश भट 

Wednesday, March 1, 2017

Anandi Anand Gade Ekade Tikade chohikade / आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे
कुणास बघते? मोदाला, मोद भेटला का त्याला?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे

---- गीतकार : बालकवी

Wednesday, July 8, 2015

Deva sundar jaga madhye lyrics / देवा सुंदर जगामंदी का रं मानूस घडविलास lyrics / Deva sundar jaga madhe ka re manus gahadavalas lyrics

हो देवा सुंदर जगामंदी का रं मानूस घडविलास
घडविलास, घडविलास, का रं मानूस घडविलास
हो भीक मागण्या भूक दिली
जन्म जाळण्या दुःख दिले
घडविलास, घडविलास, का रं मानूस घडविलास

पांघराय न्हाय दिलं, अंथराया काय दिलं
चालायला पाय दिलं, पायाखाली काय दिलं
घडविलास, घडविलास, का रं मानूस घडविलास
हो देवा सुंदर जगामंदी का रं मानूस घडविलास
घडविलास, घडविलास, दुःखामध्ये बुडविलास

इटाळ टाळण्या टाळ दिलं, मजला चरीचं भाळ दिलं
बहिरा हुन्या कान दिलं, मिटायाला डोळं दिलं
घडविलास, घडविलास, का रं मानूस घडविलास

जगण्याची दैना केली, मरण्याची चोरी केली
तहान दिली भूक दिली भिकची कटोरी दिली
घडविलास, घडविला, का रं बाबा घडविलास

हो देवा सुंदर जगामंदी का रं मानूस घडविलास
घडविलास, घडविलास, दुःखामध्ये बुडविलास

ह्योच तुझा निवाडा नि देवा तुझी रीत अशी
गरीबाची हार इथं, लबाडाची जीत अशी
घडविलास, घडविलास, का रं मानूस घडविलास

चित्रपट : ७२ मैल एक प्रवास

Tuesday, May 19, 2015

damalelya babachi hi kahani lyrics / Damlelya Babachi Kahani / दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला /

कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत, खिदळत, बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा
क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ मऊ दूध-भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला
आई परी वेणीफणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे गुज निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?

--- संदीप खरे

Wednesday, April 1, 2015

radha radha mazi radha kuthe geli bagha lyrics / राधा राधा राधा राधा राधा राधा / राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा

राधा राधा राधा राधा राधा राधा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा ।।२।।


व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण
मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान ।।२।।
काप्पाळीच्या शालूलाबी बटांचा भारी कशिदा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा ।।२।।


कुणीतरी सांगा अशी रुसू नको बाई
कृष्णाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही
गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सिधा साधा

राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा
राधा राधा राधा राधा राधा राधा

--अवधूत गुप्ते

Tuesday, March 31, 2015

तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा 
ताई, आणखि कोणाला ?
चल रे दादा चहाटळा !

तुज कंठी, मज अंगठी !
आणखि गोफ कोणाला ?
वेड लागले दादाला !
मला कुणाचे ? ताईला !

तुज पगडी, मज चिरडी !
आणखि शेला कोणाला ?
दादा, सांगू बाबांला ?
सांग तिकडच्या स्वारीला !

खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू 
चल निघ, येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू.

कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी !
अता कट्टी फू दादाशी

तर मग गट्टी कोणाशी ?

--- भा. रा. तांबे